Thursday, April 8, 2010

क्रीडा शिबिराचे उद्घाटन समारंभ संपन्न

नेशनल असोसिएशन फोंर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचालित विविध विभागांचे संयुक्त क्रीडा शिबिराचे दि.७/०४/२०१० ते १७/०४/२०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वैन्श्पायण मेडिकल कोंलेजचे माजी क्रीडा संचालक मा. शरद अकतनाळ व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश यलगुलवार हे होते. प्रास्ताविक स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक मा. नरसिंह आसादे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.शशीभूषण यलगुलवार,चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. स्मिता गलगली, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मा.सुनीता पाटील, पर्यवेक्षक मा. भारत गवळी व विद्यार्थी, पालक, शिक्षक्वृन्द उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुभाष माने यांनी केले तर आभार मा. वाबलेश्वर म्हेत्रे यांनी केले.

No comments:

Post a Comment