Monday, August 30, 2010


व्हालीबाल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांचा संघ अजिंक्य
सोलापुर शहरस्तरीय व्हालीबाल स्पर्धा पार्क स्टेडिंआम येथे नुकत्याच सम्पन्न झाल्या त्यामध्ये नँब संचालित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात स्वामी विवेकानंद प्रशालेचा सरळ सेटमध्ये पराभव करीत अजिंक्यपद पटकाविला.या संघाची बालेवाड़ी पुणे यथे होंत असलेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या संघास मा. कोळी गणपति, मा.सुरेश बटगिरे, मा.सुभाष माने यांचे मार्गदर्षन लाभले. यशस्वी संघाचे संस्थेचे अधक्ष्य मा.प्रकाश यलगुलवार, सेक्रेटरी मा.के.डी. पाटिल, सेक्रेटरी मा.शशिभूषण यलगुलवार, मुख्याध्यापिका मा.स्मिता गलगली, पर्यवेक्षक मा.भारत गवळी यांनी अभिनंदन केले.

vholibol

Thursday, April 8, 2010

क्रीडा शिबिराचे उद्घाटन समारंभ संपन्न

नेशनल असोसिएशन फोंर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचालित विविध विभागांचे संयुक्त क्रीडा शिबिराचे दि.७/०४/२०१० ते १७/०४/२०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वैन्श्पायण मेडिकल कोंलेजचे माजी क्रीडा संचालक मा. शरद अकतनाळ व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश यलगुलवार हे होते. प्रास्ताविक स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक मा. नरसिंह आसादे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.शशीभूषण यलगुलवार,चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. स्मिता गलगली, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मा.सुनीता पाटील, पर्यवेक्षक मा. भारत गवळी व विद्यार्थी, पालक, शिक्षक्वृन्द उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुभाष माने यांनी केले तर आभार मा. वाबलेश्वर म्हेत्रे यांनी केले.

Monday, January 4, 2010

एन.ए.बी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाश यलगुलवार यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त अपंगांचा स्नेह-मेळावा ..





एन.ए.बी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाश यलगुलवार यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त व लुई ब्रेल यांची २०१ वी जयंती निमित्त अपंग मेळवा घेण्यात आली.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.खा.सादुल,प्रमुख अथिती म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य-कार्यकारी अधिकारी मा.सदाशिव हरिदास ,समाज कल्याण विभागाचे वैद्यकीय अधिकारी मा.चौगुले ,अधीक्षक मा.विवेक लिंगराज व महाराष्ट्र राज्य अपंग संस्था संघटनेचे अध्य्क्ष मा.राजमाने व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
आजच्या मेळाव्यात ६१ गरजू अंधाना प्रत्येकी २०००/- या प्रमाणे अर्थ सहाय्य देण्यात आले,व तसेच ६१ अंध बांधवांना पांढरीकाठी वाटण्यात आली.उदघाटनानंतर पुढील सत्रात एन.ए.बी- महाराष्ट्र चे उपाध्यक्ष मा.सूर्यभान सालुंके व वरिष्ठ अधिकारी मा.चक्रधर जाधव यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले .मेळाव्याच्या अखेरीस अंध,मूक-बधिरांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.