Tuesday, December 8, 2009
--- ३ डिसेम्बर जागतिक अपंगदिन ---
३ डिसेम्बर जागतीक अपंगदिन निमित्त समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद, सोलापुर व सर्व अंध,मूकबधिर,अपंग व मतिमंद विद्यालय चे विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांचा रैली मधे सहभाग होता ..या रैली चा उदघाटन समाजकल्याण विभागाच्या अधिकारी श्रीमती.मनीषा फुले व् मा.चौगुले साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते . अपंगदिना निमित्त विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा घेण्यात आले ,सांस्कृतिक कार्यक्रमामधे संस्थेच्या ममता मूक बधिर विद्यालयातील ६ विद्यार्थी स्पर्धेत प्रथम व द्वितीय असे पारितोषक मिळवले तसेच अंध कार्यशाला व राजीव गांधी मेमो.स्कूल फॉर द ब्लाइंड च्या ही विद्याथी ही बक्षिसास पात्र ठरले ..
Saturday, November 14, 2009
... ममता मूक-बधिर विद्यालय येथे बालदिन साजरा ...
देशाचे पाहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचे जयंती व बालदिना निमित्त ममता मूक-बधिर विद्यालय येथे पं.नेहरूंच्या प्रातिमेस पूजन करून चाचा नेहरू यांच्या बद्दल चे विविध चित्र रेखाटून ते मुलांना दाखवण्यास आले व माहिती श्री संजय कळसे यांनी मुलांना सांगीतली,आजच्या कार्यक्रमास एन.ए.बी संस्थेचे उपाध्यक्ष मा.अंकुश कदम,सहसचिव मा.धरमचंद निमाणी,शशिभूषण यलगुलवार,मुख्याध्यापिका सौ.माधुरी शिंगाडे,शिक्षक आणि मूक बधिर विद्यार्थी उपस्थित होते.
बालदिना च्या शुभेच्या म्हणुन डॉ.विनोद जनई यांनी मूक-बधिर मुलांना मुखवटे व भेटकार्ड त्यांना भेट म्हणुन दिले ..
भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिना निमित्त ' भाजी मंडई ' हे उपक्रम घेण्यात आले..
भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिना चे औचित्त साधून चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक शाळेत ' भाजी मंडई ' हे उपक्रम घेण्यात आले ह्या उपक्रमा मधून मुलांना भाजी ,वजने व हिशोब ह्याची सम्पूर्ण माहिती मिळते. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुखपाहुणे म्हणुन सो.म.पा स्कूलबोर्डाचे पर्यवेक्षिका सौ.कपाळे हे उपस्थित होते तसेच मुख्याध्यापिका सौ.पाटील,शिक्षक व विद्यार्थी उपस्थितहोते .
Friday, November 13, 2009
Friday, November 6, 2009
राजीव गाँधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड-सोलापुर येथे अंध मुलांचे बाल मानसोपचार व व्यक्तिमत्व विकास संशोधन कार्यक्रम ..
राजीव गाँधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड-सोलापुर येथे अंध मुलांचे बाल मानसोपचार व व्यक्तिमत्व विकास संशोधन कार्यक्रम घेण्यात आले ,त्या मधे अंध बालकांचा मानसिक व बौद्धिक स्थिती चा संशोधन करण्यात आले .
कार्यक्रमास मा.डॉ.देशपांडे ,मा.डॉ.मेघा कुमठेकर व मा.शुक्ला तसेच एन.ए.बी संस्थेचे मानद सचिव मा.के.डी.पाटील ,शशिभूषण यलगुलवार,उपाध्यक्ष -मा.अंकुश कदम व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
सिने अभिनेते मा.अशोक शिंदे यांचे नेशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड - सोलापुर येथील वसतिगृहास भेट ....
नाट्य-सिने अभिनेते मा.अशोक शिंदे हे चंद्रभागाबाई यलगुलवार अध्यापक विद्यालययेथे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
नेशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड संचालित- चंद्रभागाबाई यलगुलवार अध्यापक विद्यालय मधील प्रथम वर्षामधे प्रवेश घेतलेल्या चे स्वागत-कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथि म्हणुन नाट्य-सिने अभिनेते मा.अशोक शिंदे हे उपस्थित होते .तसेच एन.ए.बी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा.प्रकाश यलगुलवार,उपाध्यक्ष मा अंकुश कदम ,सचिव-मा.के.डी.पाटील ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .
Wednesday, October 28, 2009
Louis Braille
Louis Braille
” …to open the eyes of the blind.”
Louis Braille was born January 4, 1809, in Coupvray, France. An injury to his eye at age three resulted in total loss of vision. When he was ten, he entered the Royal Institute for Blind Youth in Paris, the world’s first school for blind children. There he would live, study, and later teach.
When Louis was fifteen, he developed an ingenious system of reading and writing by means of raised dots. Two years later he adapted his method to musical notation.
Mr. Braille accepted a full-time teaching position at the Institute when he was nineteen. He was a kind, compassionate teacher and an accomplished musician. He gave his life in selfless service to his pupils, to his friends, and to the perfection of his raised dot method, which is known today as Braille.
Louis Braille died at age forty-three, confident that his mission on earth was completed.
--------------------------------------------------------------------------------
...... हेलन केलर ......
Thursday, October 15, 2009
----- जागतिक पांढरीकाठी दिन ------
नेशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा, सोलापुर
आज दि.१५ ऑक्टो.जागतिक पांढरीकाठी दिनाचे निमित्त सातरस्ता येथे अंध मुलांना रस्ता ओलांडण्याचा प्रात्यक्षिक व पांढरीकाठीचा मान राखा या बोध चिन्ह असलेल्या बोर्ड चा उदघाटन मा.डॉ.हरीष रायचूर यांच्या हस्ते झाला.कार्यक्रमास पोलिस निरीक्षक मा.दिगंबर शिंदे ,उप निरीक्षक मा.बर्डे,मा.अमबुले साहेब,मा.देशमुख साहेब व तसेच एन.ए.बी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा.प्रकाश यलगुलवार,उपाध्यक्ष-मा.अंकुश कदम ,सचिव-मा.के.डी.पाटील,कोषाध्यक्ष-मा.मैनावाले,मा.धरमचंद निमाणी,डॉ.चंद्रकांत कुलकर्णी ,श्रीमती.शामला मोडक व उपस्थित शिक्षक व विद्यार्थी .
Saturday, October 10, 2009
मा.महेशजी गादेकर मित्र परिवार तर्फे अंधमुलांना पांढरी काठी वाटप कार्यक्रम .
आज दि.१० ऑक्टो.रोजी एन.ए.बी अंध कार्यशाळेत मा.महेशजी गादेकर मित्र परिवार तर्फे अंधमुलांना पांढरी काठी वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन मा.डॉ.श्यामसुंदर तोषनीवाल ,संस्थेचे मानदसचिव मा.के.डी.पाटील,श्री.शशिभूषण यलगुलवार,उपाध्यक्ष-मा.अंकुश कदम व महेश गादेकर मित्र परिवार तर्फे श्री.रुपेश शिंदे व सहकारी ,शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते...
Wednesday, October 7, 2009
सिने अभिनेते मा.सुनील शेट्टी यांची एन.ए.बी शिक्षण संकूलास भेट !
आज दि.७ ऑक्टो.एन.ए.बी शिक्षण संकुल येथे प्रसिध्द सिने अभेनेते मा. सुनील शेट्टी हे अंध व मूकबधिर बांधवांना भेट देण्यासाठी शाळेत आले होते .
भेटीच्या वेळी संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष मा.प्रकाश.यलगुलवार, सचिव -मा.के.डी.पाटील,शशीभूषण यलगुलवार ,सह-सचिव मा.धरमचंद निमाणी,कोषाध्यक्ष-मा.माणिकसिंग मैनावाले व इतर पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते ..
Friday, October 2, 2009
महात्मा गांधी जयंती
एन.ए.बी संचालित राजीव गाँधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड व एन.ए.बी अंध कार्यशाळा येथे आज महात्मा गांधीजी यांची जयंती साजरा करण्यात आली .कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शामलाताई मोडक (अंध सदस्या),संस्थेचे उपाध्यक्ष मा.अंकुश कदम ,सचिव श्री.शशीभूषण यलगुलवार,
एन.ए.बी चे विकास आधिकारी जाधव,शिक्षक व अंधविद्यार्थी उपस्थित होते ..
Thursday, October 1, 2009
चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक शाळा पालक मेळावा
चंद्रभागाबाई यलगुलवार शिशु व प्राथमिक शाळा येथे आज १ ऑक्टो.रोजी शिक्षक -पालक मेळावा घेण्यात आला. आजच्या मेळावा मध्ये पालक -शिक्षक संघाचे सदस्य निवडण्यात आले .
पालकांच्या समस्यांच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कडून निरसन करण्यात आले.
आजच्या पालक सभेत मानद सचिव के.डी.पाटील,शशीभूषण यलगुलवार ,मुख्याध्यापिका सौ. पाटील मैडम व शिक्षक वर्ग उपस्थित होते .
Wednesday, September 30, 2009
चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला - पालक मेळावा
चंद्रभागाबाई यलगुलवार माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय येथे आज ३० सप्टे.रोजी शिक्षक -पालक मेळावा घेण्यात आला. आजच्या मेळावा मध्ये पालक -शिक्षक संघाचे सदस्य निवडण्यात आले .
पालकांच्या समस्यांच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कडून निरसन करण्यात आले.
आजच्या पालक सभेत मानद सचिव के.डी.पाटील,शशीभूषण यलगुलवार ,उपाध्यक्ष - मा.अंकुश कदम, श्रीमती. शामलाताई मोडक ,मुख्याध्यापिका कु.गलगली मैडम व शिक्षक वर्ग उपस्थित होते .
नेत्र तपासणी शिबीर
एन.ए.बी संचालित ममता मूक -बधीर विद्यालय येथे आज 30 सप्टे.रोजी जागतीक कर्ण- बधीर दिनाचा औचित्त साधून नेत्र तपासणी शिबिराचा कार्यक्रम मा.डॉ.हरीष रायचूर (नेत्र तद्न्य) यांच्या हस्ते झाला .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे उपाध्यक्ष मा. अंकुश कदम , मुख्याध्यापिका सौ.शिंगाडे ,शिक्षकवर्ग व शिबिरार्थी उपस्थित होते .
Monday, September 28, 2009
दसरा पूजा
Sunday, September 27, 2009
विजयादशमीच्या ( दसरा ) च्या हार्दिक शुभेच्छा
नेशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड कडून सर्व सभासदांना
विजयादशमीच्या ( दसरा ) च्या हार्दिक शुभेच्छा ...
भारतीय जैन संघटना -सोलापुर शहर (महिला विभाग)
उद्योगपती मा.अशोक जैन (कांकरिया) यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन आज २७ सप्टे. रोजी नेशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड- येथे भारतीय जैन संघटना -सोलापुर शहर (महिला विभाग) यांच्या माध्यमातून अंध मुलांच्यासाठी 200 बेडशीट संस्थेस भेट म्हणुन देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व एन.ए.बी चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश यलगुलवार व संस्थेचे पदाधिकारी आणि भारतीय जैन संघटना चे प्रदेश अध्यक्ष मा.ओमप्रकाशजी बाफना ,अध्यक्षा -सोलापुर शहर महिला विभाग सौ.वैजयंती अशोक जैन व सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.....
Saturday, September 26, 2009
Subscribe to:
Posts (Atom)