Thursday, March 14, 2013

अंध ,अपंग व मुक-मूक बधिरांचे राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा





नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सोलापूर या संस्थेच्या वतीने अंध ,अपंग व मुक-बधीरांचा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. वधू-वर मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वधू-वरांनी किंवा त्यांचा पालकांनी नाव नोंदणी विहित नमुन्यातील फॉर्म भरून २५ मार्च २०१३ पर्यंत नॅब संस्थेच्या पत्त्यावर पाठवावे.. ---- नोंदणी फॉर्म मिळण्याचे ठिकाण -- १) नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सोलापूर रत्नदीप हौसिंग सोसायटी ,विकास नगर ,होटगी रोड ,सोलापूर फोन -:०२१७-२७४०६०० २) ममता मुक-बधिर विद्यालय ( नॅब संचलित) राजीव गांधी इनडोअर स्टेडीयम समोर ,उत्तर सदर बझार ,सोलापूर फोन -: ९४२०५४५३७९ टीप - सदर फॉर्मचे झेरॉक्स स्वीकारले जातील .

टीप - सदर फॉर्मचे झेरॉक्सप्रत स्वीकारले जातील .

Wednesday, March 14, 2012

श्री समर्थ सांजदीप वृद्धाश्रम ..


श्री समर्थ सांजदीप वृद्धाश्रम मौजे गुळवंची बार्शी रोड ता.उत्तर सोलापूर येथे जून महिन्यापासून वृद्धाश्रम सुरु करत आहोत ,त्या मध्ये ६० वर्ष पुढील महिला व ६५ वर्षा पुढील
पुरुष अश्या वृद्धांना आमच्या आश्रमात मोफत प्रवेश दिले जाईल तसेच ह्याच वयोगटातील अंध व मूक-बधीर वृद्धांना ही प्रवेश मिळेल ..
आपल्या परिचयातील असे निराधार वृद्ध असल्यास आमच्याशी संपर्क साधा....

संपर्क:- नेशनल असोसिएशन फोर दि ब्लाईड
रत्नदीप हौ.सोसायटी ,विकास नगर ,होटगी रोड ,सोलापूर
०२१७ - २७४०६००

Monday, August 8, 2011

भित्ति शिल्पाचे उदघाटन !!!



नेशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड - सोलापुर च्या रौप्य महोतासवी वर्षानिमित्त भित्ति शिल्पाचा उदघाटन मा.जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांच्या शुभ्हस्ते झाले ...या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.काका साठे,समाज कल्याण खात्याचे सभापती मा.शिवाजीराव कांबळे ,समाज कल्याण अधिकारी मा.सुनील खामितकर ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाश यलगुलवार वस सर्व पदाधिकारी उपस्थित होते .....या शिल्पा मधे डॉ.हेलेन कलर आणि ब्रेल लिपिचे जनक लुईस ब्रेल यांचे प्रतिकृति आहेत...

अंध विद्यार्थ्यांना मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सी.डी प्लेयर वाटप...


नेशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड - सोलापूर मधील अंध विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयुक्त सी.डी प्लेयर मा .जगदीश पाटील -जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला ...

Friday, June 17, 2011

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड सोलापूर च्या रौप्य मोहोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन ..




नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड सोलापूर च्या रौप्य मोहोत्सव कार्यक्रम २,३व४ जानेवारी २०११ रोजी अंधांच्या राज्यस्तरीय विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आले ..राज्यातून जवळपास ११०० अंध व मूक-बधिर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या स्पर्धेमधे सहभाग घेतला ,त्यांच्या भोजनाची,निवासाची,सोय संस्थे मार्फ़त करण्यात आले .
तसेच सर्व अंध मुला मुलींना ट्रैकसूट,शूज,कॅप व फोल्डर बैग संस्थेच्या वतीने मोफत देण्यात आली ..
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित अंधांच्या राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मा.ना.शिवाजीराव मोघे-समाजकल्याण मंत्री,मा.महापौर,मा.जिल्हाधिकारी,मा.बाजीराव जाधव -अपंग कल्याण आयुक्त ,मा.वीरेंद्र सिंह -मुख्य कार्यकारी अधिकारी ,मा.रामेश्वर कलंत्री -अध्यक्ष एन.ऐ.बी महाराष्ट्र यूनिट,मा.आ.दिलीप माने ,मा.आ.सुभाष चव्हाण,मा.बळीराम साठे,इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते .







नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड सोलापूर च्या रोप्य मोहोत्सव उदघाटन समारंभ

Wednesday, June 15, 2011

चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक व प्रशालेत उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत ----




चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक व प्रशालेत उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत

सोलापूर : नेशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक व प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०११-१२ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी मिकी माउस व जोकर सज्ज करण्यात आले होते.ह्या कार्यक्रमास एन.ए.बी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाशजी यलगुलवार ,सचिव - मा.के.डी.पाटील,
सचिव - मा.शशिभूषण यलगुलवार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.स्मिता गलगली, प्राथमिक शालेच्या मुख्याध्यापिका मा.पाटील व शिक्षकवृन्द, पालकवर्ग उपस्थित होते.

Wednesday, May 11, 2011


नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सोलापूरच्या रौप्य महोत्सव वर्ष